महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह हे आता भाजपावासी होणार आहेत. बुधवार, ७ जुलै रोजी हा प्रवेश पार पडणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
कृपाशंकर सिंह हे काँग्रेसचे जेष्ठ नेते असून महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री राहिलेले आहेत. २००९ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मुंबईत धक्का देऊन काँग्रेसने जे यश मिळवले त्यात कृपाशंकर सिंह यांचा महत्वाचा वाटा होता. कृपाशंकर सिंह यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले आहे. पण गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून दूर होते. पण आता भाजपा प्रवेश करत ते पुन्हा राजकीय पुनरागमन करणार आहेत.
हे ही वाचा:
भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या
१२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपाचे राज्यभर आंदोलन
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांची कोठडी वाढविली १४ दिवसांनी
तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं
तर त्यांच्या सोबत नाशिक जिल्ह्यातील युवा चेहरा यतीन कदम हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यतीन कदम हे निफाडचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे चिरंजीव आहेत. यतीन हे स्वतः नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.