27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाऑनलाइन औषधांच्या नावावर फसवणूक करणारी टोळी पकडली

ऑनलाइन औषधांच्या नावावर फसवणूक करणारी टोळी पकडली

Google News Follow

Related

कोरोनाचा कहर सुरू असताना गरजवंतांना औषधांचा पुरवठा करण्याच्या नावाखाली त्यांची ऑनलाइन आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने बिहारमधून अटक केली. एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेथे ते कॉल सेंटरच्या माध्यमातून हे रॅकेट चालवत होते. धनंजय पंडित, श्रवण पासवान, धर्मजय प्रसाद, नितीश कुमार, सुमंत कुमार, विधी अशी या आरोपींची नावे आहेत. तीन जणांचा शोध सुरू आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने एक प्रकरण उघडकीस आणले आहे. १६ जूनला सायबर विभागाला एक तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीत म्हटलं होतं एका व्यक्तीने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची ऑनलाईन ऑर्डर केली होती, पण ते त्याला मिळालं नव्हतं पैसे ऑनलाईन भरण्यात आले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने तपासाला सुरुवात झाली. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून असे काही मेसेज व्हायरल करण्यात आले होते की, रेमडीसीविर इंजेक्शनच्या ऑर्डर्ससाठी संपर्क करा. लोकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना त्यासाठी आगाऊ पैसे भरण्यास सांगण्यात येत असे. पण नंतर औषध मात्र दिले जात नसे. अशी अनेकांची फसवणूक झाली. त्यामुळे पोलिसांनी गंभीर्याने तपास सुरू केला.

हे ही वाचा:

अभिरूप विधानसभेतून घुमला ठाकरे सरकारच्या निषेधाचा सूर

ट्विटरला आता उच्च न्यायालयानेही झापले

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार, पण बाकीच्यांचे काय?

साधूंना ठेचून मारले तेव्हा वाचा गेली होती काय?

बजाज फायनान्सच कर्ज मिळवून देतो, अस सांगूनही याच आरोपीनी अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आले. कोव्हिडचे जेवढे व्हेरिएन्ट्स आहेत त्यानुसार लागणारी औषध आणि त्यांची माहिती मिळवून आरोपीनी अनेकांची फसवणूक केली. हे लोक तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने त्याअनुषंगाने फसवणुकीची तयारी करत होते. या लोकांना हुडकणे कठीण होते, पण तरीही तांत्रिक बाबींच्या आधारे सायबरची टीम बिहारला पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर कळलं की हे रॅकेट चालवण्यासाठी एक कॉलसेंटर चालवले जाते आहे. या कॉल सेंटरवर धाड टाकून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यातले बरेचसे आरोपी सुशिक्षित आहेत. बी.टेक., बीएस्सी. आणि १२ वी सायन्स असे शिक्षण घेतलेले आरोपी आहेत. त्यात एक अल्पवयीन आरोपी आहे.

आतापर्यंत ६० लाख रुपये या टोळीकडून जप्त करण्यात आले आहेत. १०० हून अधिक सिमकार्डसही त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. या ६ जणांव्यतिरिक्त आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. लोकांनी जागरूकतेने ऑनलाईन व्यवहार करावेत, बऱ्याचश्या गोष्टी ऑनलाईन मिळत नाहीत त्या प्रत्यक्षात खरेदी करणं उत्तम असत. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर विभागातर्फे करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा