28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणथकबाकी भरा मगच परवाने मिळतील

थकबाकी भरा मगच परवाने मिळतील

Google News Follow

Related

अनिल अंबानींना धक्का, दूरसंचार परवाने नाकारले

कर्जाच्या विळख्यात सापडलेले उद्योजक अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता दूरसंचार मंत्रालयाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या  परवाना नुतनीकरणाला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. जोपर्यंत कंपनी थकबाकी अदा करत नाही तोपर्यंत रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, अशी अटच दूरसंचार मंत्रालयाने घातली आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने तब्बल २६ हजार कोटी रुपये थकवले आहेत. आता हे पैसे भरले नाहीत तर रिलायन्स कम्युनिकेशनला त्यांच्याकडील स्पेक्ट्रमवरील (दूरसंचार लहरी) हक्कही सोडून द्यावा लागेल. तसे घडल्यास रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपली मालमत्ताही गमवावी लागेल. त्यामुळे कंपनीच्या दिवाळखोरीची प्रक्रियाही ठप्प होऊन अनिल अंबानी यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. रिलायन्स कम्युनिकेशनकडे सध्या देशातील २२ सर्कल्समधील स्प्रेक्ट्र लहरी आहेत. यापैकी १४ स्पेक्ट्रम ८५० मेगाहर्टझचे आहेत.

कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले १६० कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेला यासंदर्भात सूचित करण्यात आले असून त्यामुळे अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

हे ही वाचा:

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही

भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!

कर्नाटक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही २०१४ पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा ०.३९ टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये १.९८ टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी १०० टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटक बँकेकडून सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा