23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणभास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या

भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या

Google News Follow

Related

विधानसभेत काल भाजपच्या १२ आमदाराचं निलंबन करण्यात आलं. त्यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाड्या आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केला आहे.

१२ आमदारांचं निलंबन झाल्यापासून भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. आम्ही कोकणातले आहोत जाधवही कोकणातले आहेत. दशावतार असतात कोकणात. त्यात नरकासुर असतो. तो वेगवेगळे सोंग बदलतो. सोंगाड्याही असतो त्यात. जे जे भास्कर जाधवला ओळखतात त्याना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही. काल त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केलं नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत. आमच्या सारखे लोक त्यांना चांगलं ओळखून आहे. ते काय काय करतात ते आम्हाला माहीत आहे, असं सांगतानाच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला आहे. त्यांना काहीही झालं नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले का नाही? त्यांनी स्वत:चे कपडे का नाही फाडून घेतले. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात, असं नितेश राणे म्हणाले.

भास्कर जाधव जसे सोंगाड्या आहेत. तसे मुख्यमंत्रीही सोंगाड्या आहेत. एक सोंगाड्या वर बसलेला होता. ते दुसरा खाली. मुख्यमंत्री सभागृहात काहीच बोलत नाही. कारण तेही सोंगाड्याच्या भूमिकेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

१२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपाचे राज्यभर आंदोलन

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

२ महिन्यात राज्यातील ७ कोटी ‘गरिबांचे कल्याण’

भाजपचे १२ आमदार ओबीसींसाठी लढले. जनतेसाठी लढले, असं सांगतानाच आता आम्ही लोकांमध्ये जाऊन आमचे म्हणणे मांडू, असंही त्यांनी सांगितलं.

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण १२ सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा