22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणतुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

Google News Follow

Related

विधिमंडळात घुमल्या घोषणा

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव असले पाहिजे, अशा घोषणा विधिमंडळाच्या परिसरात सोमवारी घुमल्या. भाजपाच्या आमदारांनी दिबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे म्हणून तीव्र निदर्शने विधिमंडळात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला दिलेच पाहिजे, अशी स्थानिकांची मागणी आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. पण स्थानिकांचे म्हणणे आहे की, नाव हे दि. बा. पाटील यांचेच दिले गेले पाहिजे. त्यावरून सोमवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दि. बा. पाटील यांच्या नावाचे बॅनर बनवून त्यांचेच नाव या विमानतळाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली गेली.

हे ही वाचा:

ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार

ठाकरे सरकारचा धोरणलकवा विद्यार्थ्यांच्या मुळाशी

वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप

भाजपाचे १२ निलंबित आमदार ५:४५ वाजता राज्यपालांना भेटणार

प्रश्न फक्त नाही नावाचा, आहे भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा, हुतात्म्यांच्या बलिदानाचा, स्थानिकांच्या स्वाभिमानाचा अशा घोषणा लिहिलेले बॅनर भाजपा आमदारांनी फडकाविले आणि दि. बा. पाटील यांच्या नावाची आग्रही मागणी केली.

दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला दिले जावे यासाठी गेले अनेक दिवस नवी मुंबईतील नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाकरता भूमिपूत्र विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आता अधिकच तीव्र झालेला आहे. याकरता मध्यंतरी तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईमधून असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन कृती समितीने ठाकरे सरकारला आता १५ ऑगस्टपर्यंतचा पर्याय दिलेला असून विमानतळाला दि.बां.चे नाव नक्की करण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख देण्यात आलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा