शनिवार, ३ जुलै रोजी पार पडलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यनंतर स्पर्धेचे उपांत्य फेरीतील चार संघ निश्चित झाले आहेत. शनिवारच्या दोन सामन्यांमध्ये डेन्मार्क आणि इंग्लंड या दोन संघांनी विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली आहे त्यांनी अनुक्रमे चेक रिपब्लिक आणि युक्रेन या दोन संघांचा पराभव केला आहे.
शनिवारच्या पहिला सामना डेन्मार्क आणि चेक रिपब्लिक या दोन संघांमध्ये रंगला होता डेन्मार्क स्टार खेळाडू एरिकसनच्या अनुपस्थितीत दोन्ही संघांची ताकद एकसमानच आहे असे वाटत होते. या सामन्यात डेन्मार्कने चेक रिपब्लिक संघाला पराभूत केले. डेन्मार्कने सुरवातीपासूनच या सामन्यावर पकड मिळवली होती. सामन्याच्या पहिल्या हाल्फमध्ये डेन्मार्कने २-० अशी आघाडदी मिळवली होती. दुसऱ्या हाल्फमध्ये सुरुवातीच्या मिनिटांमध्ये गोल नोंदवत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
हे ही वाचा:
इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त
धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे
न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर
आंतरराष्ट्रीय कुबेर, वागळे आणि राऊत
दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा संघ तुलनेने युक्रेनपेक्षा अधिक बलवान होता. त्यामुळे स्वाभाविकपणे इंग्लंड होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात होती. पण अनेक बड्या संघांना मागे टाकत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा युक्रेन संघ इंग्लंडला पाणी तर पाजणार नाही ना, याकडेही जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा होत्या. पण तसे काही या सामन्यात घडताना दिसले नाही. अपेक्षेप्रमाणे इंग्लंड संघाने युक्रेनचा धुव्वा उडवला. इंग्लंड संघाने आक्रमक खेळ करत ४-० असा विजय नोंदवून उपांत्य फेरीत धडाक्यात एन्ट्री घेतली. त्यामुळे आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेन विरुद्ध इटली आणि डेन्मार्क विरुद्ध इंग्लंड असे सामने रंगणार आहेत.