25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेष'१०० जीव वाचवायचे होते....' असे लिहीत एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या

‘१०० जीव वाचवायचे होते….’ असे लिहीत एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या

Google News Follow

Related

पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणात स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरची आर्थिक चणचण, त्यात एमपीएससी परीक्षेचा सावळा गोंधळ या साऱ्या परिस्थितीला कंटाळत स्वप्नीलने आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे.

स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे राज्यातील एमपीएससीच्या मार्फत होणाऱ्या नियुक्त्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१९ आणि २०२० साली स्वप्नीलने एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. पण त्यानंतर या परीक्षा प्रक्रियेतील महत्वाचा भाग असलेली मुलाखत ही झालीच नाही. त्यामुळे स्वप्नील सह राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांची सरकारी अधिकारी म्हणून नियुक्ती रखडून राहिली आहे.

हे ही वाचा:

इराण-अफगाणिस्तानमार्गे आलेलं ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त

धर्मांतरानंतर दहशतवादी बनलेल्या मुलीसाठी आईचे केंद्राकडे साकडे

न्यूयॉर्क टाइम्सची जाहिरात: भारतात हवा मोदीविरोधी वार्ताहर

आंतरराष्ट्रीय कुबेर, वागळे आणि राऊत

२०२१ मध्ये एमपीएससीमार्फत घेण्यात आलेली पूर्व परीक्षा देखील स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. स्थापत्य अभियांत्रिकीचा तो पदवीधर होता. मुळचा दौंड तालुक्यातील रहिवाशी असणारा स्वप्निल लोणकर आपल्या कुटुंबासमवेत पुणे येथे येऊन स्थायिक झाला होता. पुण्यातील प्रसिद्ध शनिवार पेठ मध्ये त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता.

स्वप्निलच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो येणाऱ्या प्रत्येक दिवशी फक्त वय आणि कर्जाचा डोंगर वाढत जात आहे आणि आत्मविश्वास लयाला जात आहे. यात तो सेल्फ डाऊट बद्दलही बोलतो. अधिकारी होण्याच्या आशेवर घेतलेले कर्ज, ते वाढत जाऊन त्याचा झालेला डोंगर हा खाजगी नोकरीतून भरून निघू शकत नाही असे स्वप्निल या पत्रात सांगतो. तर आपल्याला १०० जीव वाचवायचे होते असेही स्वप्नीलने पत्रात लिहिले आहे.

या विषयावरून राजकारण तापले असून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेला दिसत आहे भाजप आमदार राम सातपुते, गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा