27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषआमिर खानच्या घटस्फोटानंतर 'लव्ह जिहाद' पुन्हा चर्चेत

आमिर खानच्या घटस्फोटानंतर ‘लव्ह जिहाद’ पुन्हा चर्चेत

Google News Follow

Related

अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ट्विटरवर #LoveJihad हा हॅशटॅग वापरून अनेक पोस्ट पडल्या आहेत. या पोस्ट्स मधून अभिनेता आमिर खानवर सडकून टीका करण्यात आली आहे.

सध्या देशभर लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत असतानाच अभिनेता अमीर खान याच्या घटस्फोटाची बाब पुढे आली. बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने आपली पत्नी किरण राव हिच्या सोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १५ वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण राव यांनी हा निर्णय घेतला. परस्पर सहमतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असले तरीही नेटकऱ्यांनी मात्र या घटस्फोटात लव्ह जिहादचा अँगल शोधला आहे.

आमिर खान याने किरण राव या एका हिंदू महिलेशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला आणि नंतर त्याने राव यांना घटस्फोट दिला. या साऱ्या आरोपांना आमिरच्या पहिल्या लग्नाची पार्श्वभूमी आहे. आमिर खान यांनी रिना गुप्ता हिच्याशी लग्न केले होते. रिनासोबत आमिरला २ मुले आहेत. पण आमिरने १६ वर्षांच्या संसारानंतर रिना हिच्यासोबत घटस्फोट घेतला. आमिरची तिन्ही मुले ‘खान’ आडनाव लावतात. त्यामुळे या साऱ्या गोष्टी लक्षात घेता आमिरवर लव्ह जिहादचा आरोप होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा