31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणहल्लेखोरासोबत पडळकरांवरही गुन्हा

हल्लेखोरासोबत पडळकरांवरही गुन्हा

Google News Follow

Related

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यासोबतच पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला गेला आहे. राज्यभर सुरु असलेले संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गोपीचंद पडळकर यांच्या सोबतच इतर १० ते १५ जणांची नावे असल्याचे समजते.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवार, ३० जून रोजी दगडफेक करण्यात आली. सोलापूर येथे ही घटना घडली असून ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हल्ला करणारा इसमही कॅमेरात कैद झाला असून त्याचे नाव अमित सुरवासे असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून त्याने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही.

हे ही वाचा:

अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही

कोस्टल रोडच्या कामात खोडा घालणाऱ्यांना खडे बोल

सहआयुक्त संखेंच्या बदलीमुळे अनधिकृत बांधकामांना अभय ?

पण दरम्यान सोलापूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणाऱ्या या हल्लेखोराची ओळख पटली असून अमित सुरवासे असे त्याचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. अमित सुरवासे हा सध्या फरार असल्याचे समजत आहे. तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल केला गेला आहे. यावरून पडळकर हे आक्रमक झाले असून आपण संचारबंदीचे कोणतेही नियम मोडले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालय उदघाटनाची वेळी अजित पवारांच्या उपस्थितीत हजरोंची गर्दी लोटली होती तेव्हा अजित पवारांवर का गुन्हा दाखल झाला नाही? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा