महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि खाजगी सहाय्यक संजीव पालांडे यांना ईडीने, PMLA (Prevention of money laundering act) कायदयाखाली २६ जून रोजी अटक केली होती. आज त्यांना PMLA COURT क्रमांक १६ येथे दुसऱ्या रिमांड करिता आणण्यात आले होते. त्यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.
ईडीने या न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, हे दुसरे रिमांड आहे आम्हाला आणखी सात दिवस कोठडी मिळावी.
वरील तपास पूर्ण झालेला नसून या सात दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोस्टिंग, बारमधून पैसा गोळा करणे या प्रकरणांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?
आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!
दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?
गुलशन कुमारचा मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए आणि पीएस असल्याने या दोघांनी याप्रकरणात मुख्य भूमिका बजावली आहे आहे. आमच्याकडे सचिन वाझे याचा जबाब असून त्याबाबतही आम्हाला तपास करावयाचा आहे. ईडीने पुढे असेही सांगितले की, एका माजी मंत्र्यांच्या खात्यात पैसे जात होते आणि हे सर्व पैसे रोख रकमेमध्ये जमा करण्यात आले.
वरील प्रकरणात काही संशयितांचा तपास अपूर्ण आहे.
यावेळी कोर्टासमोर संजीव पालांडे यांचे वकील अॅड. जाधव यांनी युक्तिवाद केला की, २२ मे रोजी सीबीआयने कित्येक तास पालांडे यांची चौकशी केली. पालांडे यांनी या चौकशीला सहकार्य केले. त्यानंतर सीबीआयने कधीच फोन केला नाही.
सदरचे प्रकरण राजकीय स्वरूपाचे असून माझे अशील अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचे अधिकारी असून त्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन करते वरील बाब माननीय न्यायालयाने लक्षात असू द्यावी.
सचिन वाझे यांनी एक साधा आरोप केला आहे. एका बार मालकाने सांगण्यानुसार त्याने सचिन वाझे यांना पैसे दिले आहेत, असा आरोप ठेवून माझ्यावर खटला चालविण्यात आलेला आहे, असेही पालांडे यांच्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले.