हुकुमशाहीसाठी आणि अण्वस्त्र तयार करण्यातील आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरियाच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. उत्तर कोरियाच्या नागरिकांवर आता उपासमारीची वेळ आलीय. आधीच अण्वस्त्र चाचण्यामुळे जागतिक निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. त्यातच आता अन्नधान्याच्या तुटवड्यानं त्यांचं कंबरडं मोडलंय. विशेष म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीपासून उत्तर कोरियाने त्यांच्याकडे कोणताही संसर्ग आला नसल्याचा दावा केला. जागतिक आरोग्य संघटनेलाही कोरोनाची कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही.
आर्थिक परिस्थिती बिघडल्यानं आणि लोकांवर उपासमारीची वेळ आली. त्यानंतर उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंगने याला काही लोकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं म्हटलंय. उत्तर कोरियातील या परिस्थितीला किम जोंगने आपल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील केलीय. किम जोंगने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय, तर काही अधिकाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवलाय.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियात कोरोना संसर्ग असल्याचा आरोप केलाय. मात्र, उत्तर कोरियानं हा आरोप फेटाळलाय. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने उत्तर कोरियात कोरोना संसर्ग असल्याचं म्हटलंय. त्यातच अण्वस्त्र चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचाही फटका उत्तर कोरियाला बसलाय. याशिवाय चीनच्या सीमेवरही कठोर निर्बंध लावण्यात आलेत. त्यामुळे उत्तर कोरियाचा व्यापरही ठप्प झालाय. अशी सगळी परिस्थिती असताना नैसर्गिक संकटांमुळे यंदा उत्तर कोरियातील पिकंही नष्ट झालीत. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. याचाच परिणाम म्हणून येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आलीय.
हे ही वाचा:
कोस्टल रोडच्या कामात खोडा घालणाऱ्यांना खडे बोल
अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही
पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक
उत्तर कोरियाला मे अखेर एस्ट्रोजेनेका पीएलसीचे १.७ मिलियन (१७ लाख) डोस मिळणार होते. मात्र नियमांचं पालन न केल्यानं हे लसीचे डोस मिळण्यातही अनेक अडचणी येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही लसींचा पुरवठा होऊ शकला असता मात्र त्यातही उत्तर कोरियाच्या भूमिकेमुळे अडथळे आले.