विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागली आहे. गेल्या वर्षभरात निसर्ग आणि तौक्ते या दोन वादळांमुळे कोकण पट्ट्यात झालेल्या नुकसानाच्या भरपाईच्या मुद्द्यावरून दरेकर आक्रमक झाले आहेत. ‘आधीच संकटात असलेल्या कोकणी माणसाची थट्टा थांबवा’ असा इशारा दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
२०२० मध्ये निसर्ग तर यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये तौक्ते या चाकरी वादळाचा फटका कोकणवासीयांना बसला. या चक्रीवादळात समुद्र किनाऱ्या लगतच्या कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये आर्थिक नुकसान झाले. राज्य आर्थिक संकटात असतानाही सरकारने या नुकसानग्रस्तांना मदत केल्याचे सांगत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी सरकारची पाठ थोपटण्याचा प्रयत्न केला आहे. तर सरकारने आपला शब्द पाळला आहे आणि वाढीव नुकसान भरपाई दिली आहे असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र
गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?
शालेय पाठ्यपुस्तकात होणार ‘ऐतिहासिक’ सुधारणा
यावरूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आक्रमक झाले असून त्यांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे. चार ट्विटरच्या माध्यमातून दरेकरांनी वडेट्टीवारांची खरडपट्टी केली आहे. चार ट्विट्सचा थ्रेड दरेकर यांनी टाकला आहे. आपल्या या ट्विट्समध्ये दरेकरांनी ठाकरे सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. दरेकर आपल्या ट्विट्समध्ये म्हणतात ‘कोकण विभागीय आयुक्तांनी नुकसानीचा ४७ कोटीचा अहवाल पाठवला, संजय राऊत साहेबांनी 2 हजार कोटीची मागणी केंद्राकडे केली, तुम्ही त्यावेळी एनडीआरएफकडून ७२ कोटी रुपये मिळतील, असं सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतात निसर्गपेक्षा तौक्तेमध्ये नुकसान जास्त झालं. निसर्गचं नुकसान किती होतं? ६५४ कोटी रुपये. मुख्यमंत्र्यांनी तौक्तेची मे महिन्यात मदत किती जाहीर केली? २५२ कोटी रुपये.
मुख्यमंत्र्यांनी चीपी विमानतळावर आढावा घेतल्यानंतर निसर्गपेक्षा तौक्तेमध्ये नुकसान जास्त झाल्याचं माध्यमांना सांगितलं.
निसर्गचं नुकसान किती होतं? 654 कोटी रुपये.— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 30, 2021
आता आपण सांगता, वाढीव मदतीचा शब्द सरकारने पाळला…’ असे म्हणत दरेकरांनी ठाकरे सरकारच्या दाव्यांमधली हवा काढली. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये कशाचं कशाला ताळतंत्र आहे का हो? अगोदरच संकटात असलेल्या आमच्या कोकणी माणसाची थट्टा आता थांबवा! असे म्हणत दरेकरांनी सरकारला चांगलीच चपराक लगावली आहे.
170 कोटी 72 लाख, 73 हजार मंजूर केले.
निसर्गच्या 25 टक्के एवढीही मदत तुम्ही दिली नाही हो.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कशाचं कशाला ताळतंत्र आहे का हो? अगोदरच संकटात असलेल्या आमच्या कोकणी माणसाची थट्टा आता थांबवा!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 30, 2021