कोरोना रुग्णांवर उपचार करण्याबाबत केंद्र सरकारने काही नियमावली आखली आहे. मात्र, या नियमांचं उल्लंघन करत थेट एकाच रुग्णाला १४ रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात समोर आला आहे. संबंधित प्रकार हा खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. लाईफलाईन रुग्णालय सील करुन पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी दिले आहेत. संबंधित घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही रुग्णालयाला कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्ह्याचे शल्य चिकित्सक यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं. मात्र, बुलडाण्यातील खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी न घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. याबाबतची तक्रार प्रशासनाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना तात्काळ चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अहवाल स्थापन करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
कॅन्सर रुग्णालयावरून शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड
ठाकरे सरकार सत्तेच्या नशेत धुंद
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
आरबीआची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई
संबंधित समितीने चौकशी केली असता अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. यामधील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एकाच रुग्णाला तब्बल १४ रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस देण्यात आले होते. या समितीने संपूर्ण अहवाल जिल्हाधिरी एस राममूर्ती यांच्यासमोर सादर केला. त्यांनी संपूर्ण अहवालाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लाईफलाईन रुग्णालय सील करण्याचे निर्देश दिले. तसेच पोलिसातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.