मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण न दिल्यावरुन आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. हा व्यक्तिशः माझाच नव्हे तर पुणेकरांचाही अपमान आहे. ही गोष्ट पुणेकर कायम लक्षात ठेवतील, असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीला दिला.
ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. मी नेहमी समन्वयाने पुढे जाण्याचे धोरण ठेवतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पुण्याला मदत मिळत नसतानाही मी कधी राजकारण केलं नाही. मात्र, आता मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण मला देण्यात आले नव्हते. हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे, असे मोहोळ यांनी म्हटले. राज्य सरकारने पालिकेला कोरोना काळात भरीव मदत केली नाही, असा आरोपही महापौरांनी केला. त्यामुळे आता यावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकते. त्या संबंधीचे परिपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. किमान २० जुलैपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
चीनी सीमेवर भारताने तैनात केले ५० हजार जवान
बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा
नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका
अनिल देशमुखांच्या अडचणींत का होणार आहे वाढ?
सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी, अशी जनजागृती प्रशासन करत आहे. अशात महापालिकेचे कर्मचारी लसीअभावी मागे राहू नयेत, म्हणून थेट वेतन स्थगित करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी सूचित केलं आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण ७ हजार ४७९ कर्मचारी आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदार पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही ही लस घेतलेली नाही.