कालपासून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरात निर्बंधांची मालिका सुरू झालेली आहे. कालपासून दुकाने सायंकाळी ४ पर्यंत खुली राहणार, असे सरकारने जाहीर केल्यानंतर आता व्यापारी वर्गाचा संताप अनावर झालेला आहे. तसेच सायंकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सर्वच व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे. व्यापारी वर्ग या निर्बंधांच्या विरोधात आक्रमक झालेला असून, दुकानांची वेळ वाढवावी, अशी मागणी आता सरकारकडे केलेली आहे. यामध्ये पुणे, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील व्यापारी वर्ग आता सरकारविरुद्ध चांगलाच आक्रमक झालेला आहे.
निर्बंधामुळे अनेक शहरांमधील व्यापारी वर्ग आता अस्वस्थ झालेला असून, आता धंद्याचे काय होणार हाच प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळेच आता सरकारने यावर ठोस उपाययोजना करून व्यापारी वर्गाला वेळमर्यादा वाढवून द्यावी, असे व्यापारोद्योग महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांनी केलेली आहे.
हे ही वाचा:
केंद्र सरकारच्या नव्या आर्थिक पॅकेजचे स्वागत
अनिल देशमुखांच्या अडचणींत का होणार आहे वाढ?
नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका
उंदरामुळे एका रुग्णाचा जीव गेल्यानंतरही राजावाडीत अस्वच्छता
जूनमध्ये पहिल्या आठवड्यांमध्ये खुले झालेले निर्बंध पुन्हा एकदा लादण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेपुढे आता खायचे काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. व्यापारी वर्ग तर या निर्बंधांच्या कचाट्यात अक्षरशः होरपळलेला आहे.
गेले दीड वर्षे आपण कोरोना या महामारीसोबत लढतोय. त्यामुळेच आता आपणही कोरोनासोबत जगायला शिकलोय. कोरोनामहामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीही करण्यात आली. सर्वात जास्त टाळेबंदी ही महाराष्ट्रात झालेली आहे, तरीही सर्वाधिक मृत्यू एकट्या महाराष्ट्राने पाहिलेत. आरोग्य व्यवस्था कूचकामी ठरत असल्याने ठाकरे सरकार उघड्यावर पडलेले आहे. सरकार जनमानसावर अशा पद्धतीने निर्बंध लावून सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेचा आता अंत पाहात आहे.