काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना काँग्रेसचे दिवंगत नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचा विसर पडला आहे. सोमवार, २८ जून रोजी नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप झाला. पण काँग्रेस पक्षाच्या या दिवंगत नेत्याचे साधे स्मरणही राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना करावेसे वाटले नाही.
भारताचे माजी पंतप्रधान पामुलापर्थी वेंकटा नरसिंह राव अर्थात पी.व्ही.नरसिंह राव यांचा जन्म १९२१ साली २८ जून या दिवशी झाला होता. त्यामुळे यावर्षीचा २८ जून हा दिवस त्यांची शंभरावी जयंती ठरला. ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिले. पण तरीही नरसिंह राव यांची काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या नेहरू-गांधी कुटुंबाने कायम उपेक्षाच केली आहे. याचीच प्रचिती त्यांच्या शंभराव्या जयंतीच्या दिवशी पुन्हा आली.
हे ही वाचा:
ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा
भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे
परमबीर सिंग दोन महिने सुट्टीवर
प्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा हे दोघेही ट्विटरवर चांगलेच सक्रिय असतात. दर दिवशी केंद्र सरकारवर टीका करत असतात. पण त्यांना नरसिंह राव यांच्या जयंतीचे एक साधे ट्विटही करावेसे वाटले नाही. तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून जे एक औपचारिकता म्हणून ट्विट केले गेले त्याला या दोघांनी साधे रिट्विटही केलेले दिसले नाही. त्यामुळे नेहरू-गांधी कुटुंबातील काँग्रेस नेत्यांच्या मनात नरसिंह राव यांच्या बाबतीत इतकी कटुता का? हा सवाल पुन्हा उपस्थित झाला.
नरसिंह राव यांच्या मृतदेहाचाही काँग्रेसकडून अपमान
२३ डिसेंबर २००४ रोजी जेव्हा नरसिंह राव यांचे निधन झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी त्यांचा मृतदेह दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार होता. पण ज्या वेळी त्यांचा मृतदेह काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या दाराशी आणला गेला, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्ष कार्यालयाचे दरवाजे उघडायला परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांचा मृतदेह हा काँग्रेस कार्यालयाच्या दारातूनच परत नेला गेला.