25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषरोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का

रोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का

Google News Follow

Related

बेल्जियम कडून रोनाल्डोच्या पोर्तुगालला रविवारी चांगलाच धक्का बसला. अत्यंत चुरशीच्या अश्या सामन्यात बेल्जियमने पोर्तुगाल विरुद्ध एक गोल करून बढत मिळवली आणि नंतर पोर्तुगालला रोखण्यातही बेल्जियमला यश आलं. बेल्जियमने पोर्तुगालचा १-० असा पराभव केला आणि त्यांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उपउपांत्य फेरीत आता बेल्जियमला इटली संघाशी सामना करावा लागणार आहे.

बेल्जियम आणि पोर्तुगाल दोन्ही बलाढ्य संघ. समोरासमोर उभं केल्यावर प्रत्येक खेळाडू तोडीसतोड वाटेल असे दोन्ही संघ. मैदानात उतरल्यावर खरोखर खेळ तसा झालाही. या दोन्ही संघांचा इतिहास पाहिला तर १९८९ पासून हे दोन संघ ५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत आणि पाचही वेळा पोर्तुगालचं बेल्जियमवर वर्चस्व राहिलेलं आहे. या सामन्यातही तेच होईल असे सगळ्यांना वाटत होतं, पण शेवटी बेल्जियम संघाचा खेळ, प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ यांचे डावपेच आणि थोरंग हझार्ड याचा गोल बेल्जियम संघाला विजयी करण्यात महत्वाचे ठरले.

नेदरलँड्सचे युरो कपमधून ‘चेक’ आऊट

जगात भारी, दीपिका कुमारी!

पंतप्रधान मोदींनी घेतली तिरंदाज प्रवीण जाधवची दखल

२०१६ युरोज स्पर्धेचा गतविजेता पोर्तुगाल उपउपांत्य पूर्व फेरीत बेल्जियम संघासमोर मोठं आव्हान ठेवणार हे निश्चित होतं. बेल्जियम संघाकडून केविन डी ब्र्यूने आणि इडन हझार्ड खेळत होते त्यामुळे बेल्जियम मिडफिल्ड खूप ताकदवान झाली होती. पोर्तुगालकडे रोनाल्डो सारखा जो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधे नवीन नवीन विक्रम करत चालला आहे असा खेळाडू खेळत होता आणि त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. सामना सुरु झाला त्यावेळी रोनाल्डोला केवळ एक गोल हवा होता जेणेकरून इराणच्या अली दाईलला मागे टाकून फुटबॉलमध्ये नवा विश्वविक्रम केला असता. ११० गोल करून रोनाल्डोने नवीन विक्रम नोंदवला असता पण बेल्जियम संघाने उत्तमप्रकारे खेळ दाखवला आणि रोनाल्डोला नवीन विक्रम करता आला नाही. या संपूर्ण सामन्यामध्ये पोर्तुगालने ५९७ पासेस केले तर बेल्जियमने ४५१ आणि पोर्तुगालने एकूण २३ वेळ गोल करण्याचा प्रयत्न केला पण एकदाही त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे बेल्जियमने १४ वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला आणि थोरंग हझार्डने बेल्जियमकडून सामन्याच्या ४३व्या मिनिटात गोल करून आपल्या संघाला बढत मिळवून दिली आणि नंतर ती बढत कायम राखण्यात बेल्जियमला यश आलं आणि सामना जिंकून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. गतविजेत्या उपउपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला त्यामुळे आता रोनाल्डोला विश्वविक्रम करायला अजून काही महिने थांबण्याची नामुष्की ओढवली. उपउपांत्य फेरीत आता बेल्जियमला इटली संघाशी सामना करावा लागणार आहे.

क्रोएशिया विरुद्ध स्पेन (आज रात्री ९:३०) आणि फ्रान्स विरुद्ध स्वित्झरलँड (आज रात्री १२:३०) असे पुढचे सामने होणार आहेत आणि यामध्ये कोण सरस ठरतं यासाठी युरो स्पर्धा आपल्याला बघावी लागणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा