सर्वोच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळांना बारावीचे निकाल हे ३१ जुलैपूर्वी जाहीर करावेत, असा आदेश काढला. आदेश काढला परंतु शिक्षकांना मात्र राज्य सरकारकडून कुठल्याच मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. कोरोनामुळे दहावीनंतर बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. परंतु आता मूल्यमापन प्रक्रिया कशी करायची यावरून संभ्रम अजूनही कायमच आहे.
शिक्षकांना अजून सूचना नसल्यामुळे निकाल कसा जाहीर करायचा असा यक्षप्रश्न आता शिक्षकांना पडलेला आहे. दहावीच्या निकालाबाबत राज्याने घातलेला घोळ आता कुठे निस्तरत आला तोवर आता बारावीचा निकाल समोर आला. दहावीच्या शिक्षकांना आत्तापर्यंत लोकलप्रवासाची परवानगी नसल्याने शाळेत जायचे कसे हा प्रश्न होता. इकडे तर अजून कुठल्याही मार्गदर्शक सूचना नाहीत, त्यामुळे हा निकाल नेमक्या कोणत्या पद्धतीने लावायचा याबाबत शिक्षकच अनभिज्ञ आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या निकालाबाबतचे स्पष्टीकरण आता शिक्षकांना मिळाले आहे. त्यामुळे दहावीच्या निकालकामांना आता वेग आलेला आहे. परंतु बारावीबाबतच्या कोणत्याही सूचना अजूनही राज्य सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे निकालाचे काम कसे करायचे याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
हे ही वाचा:
मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध परांजपे बिल्डर्स पोलिसांच्या ताब्यात
राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही कारण…
देशमुख, परब ही प्यादी; खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर
आता राज्य सरकारकडून वेगाने पावले उचलणे गरजेचे आहे. बारावीची निकालपद्धती कशी असणार यावरच आता अनेक गोष्टी ठरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ३१ जुलैच्या आत निकाल जाहीर करायचा असेल तर, आता ठाकरे सरकारने लवकरात लवकर मार्गदर्शक सूचना जाहीर करायला हव्यात.
टाळेबंदीच्या नावाखाली असलेले निर्बंध यामुळेही निकालप्रक्रियेला उशीर होत आहे हे आता स्पष्ट झालेले आहे. ठाकरे सरकारने किमान आता तरी जागे होऊन निर्बंध कमी करावेत. जेणेकरून शिक्षकांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाता येईल. निकाल लावताना अनेकांचे पुढील भवितव्य अवलंबून असते, त्यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकार जागे होतेय का हे पाहायला हवे.