27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारण'लुटा आणि वाटून खा' हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

‘लुटा आणि वाटून खा’ हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा एक कलमी किमान समान कार्यक्रम असल्याचा घणाघात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र भाजापाचे प्रभारी सी.टी.रवी यांनी केला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत ते बोलत होते.

गुरुवार, २४ जून रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रची प्रदेश कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाचे राज्याचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी.रवी हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते. ऑनलाईन माध्यमातून बंगलोरमधून सहभागी झाले होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना रवी यांनी ठाकरे सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले.

हे ही वाचा:
दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले दौरा अर्धवट टाकून दिल्लीला

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात भ्रष्टाचार साथीसारखा वाढत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे तांडव चालू आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची अनेक प्रकरणे उघड झाली. त्यापैकी दोन जणांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्राला लुटणे एवढे एकच काम या सरकारचे चालू आहे. ही महाविकास आघाडी राज्याला विनाशाकडे नेत आहे. त्यांचा लुटा आणि वाटून खा एवढा एकच किमान समान कार्यक्रम आहे असे टीकास्त्र सी.टी.रवी यांनी डागले. तर महाविकास आघाडीचे हे लुटीचे स्वप्न भाजपा पूर्ण करू देणार नाही असे सी.टी. रवी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्वविरोधी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. शिवसेना आपले ध्येय विसरली असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न उध्वस्त केले आहे. भाजपाने युतीमध्ये निवडणूक जिंकली तरी भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. पण आजही भाजपाला जनतेच्या मनात स्थान आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत मविआ सरकार विरोधात जनतेमधील असंतोष दिसला आणि लोकांनी भाजपाला विजयी केले. लोकांच्या सरकारवरील नाराजीचे आक्रोशात रुपांतर होत आहे असा हल्लाबोल रवी यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा