कोविड १९ विरोधातील लसीकरण मोहिमेत भारताने एक मैलाचा टप्पा ओलांडला आहे. भारतातर्फे आत्तापर्यंत ३० कोटी लसी देण्यात आल्या आहेत.भारतासाठी हे एक महत्वाचे यश मानले जात आहे. गुरुवार, २४ जून रोजी ही आकडेवारी समोर आली असून आतापर्यंत ४०,४५,५१६ सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण ३०,१६,२६,०२८ इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तर यापैकी गेल्या २४ तासांत, लसीच्या ६४,८९,५९९ मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारताने कोविड लसीकरणाच्या बाबतीत वेग पकडला असून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी २१ जून पासून लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिकीकरण करण्याचा नवा टप्पा सुरु झाला आहे. भारत सरकारने लसीकरणाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. सध्या देशात १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. तर १८ वर्षाखालील नागरिकांच्या लसीकरणासाठी सध्या प्रयोग सुरु असून लवकरच त्यांचेही लसीकरण सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
धडधाकट झाडांवर पालिकेची कुऱ्हाड
…तर कोविशिल्डचा एकच डोस पुरे!!
नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु
बापरे! मोबाईल चोरामुळे इसम गंभीर जखमी
या लसीकरण मोहिमेच्या बाबतीत आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारताने आत्तापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ७,०६,६२,६६५, नागरिकांना आपला पहिला डोस देण्यात आला आहे तर १५,०२,०७८ नागरिकांना दोन्ही डोस देऊन झाले आहेत. तर ४५ ते ५९ वयोगटातील ८,३९,३८,६८३ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे तर १,३३,५१,४८८ नागरिकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. तर ६० वर्षांच्या वरील ६,६१,६१,००४ जेष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर २,२२,२९,५४६ जणांना दोन्ही डोस देऊन पूर्ण झाले आहेत. तर आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १,०१,५८,९१५ जणांना पहिला डोस दिला आहे तर ७१,३२,८८८ जणांना दोन्ही डोस देऊन पूर्ण झाले आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपैकी १,७३,०३,६५८ नागरिकांना पहिला डोस दिला आहे तर ९१,८५,१०६ जणांना दोन्ही डोसची मात्रा पूर्ण झाली आहे.