देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनी आगामी काळात उर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता डिजिटल क्षेत्रापाठोपाठ उर्जा क्षेत्रातही रिलायन्स कंपनी सुपरपॉवर होण्याच्या दिशेने पहिले पाऊस पडले आहे.
यासंदर्भात बोलताना मुकेश अंबानी यांनी सांगितले की, २०१६ मध्ये देशाच्या डिजिटल विश्वातील पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही जिओ कंपनी सुरु केली. २०२१ मध्ये रिलायन्स कंपनी उर्जा क्षेत्रात नवा व्यवसाय सुरु करणार आहे. ग्रीन एनर्जीद्वारे या क्षेत्रात क्रांती आणणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या १५ वर्षात रिलायन्स ही झिरो कार्बन उत्सर्जन करणारी कंपनी असेल, असा संकल्प यावेळी मुकेश अंबानी यांनी जाहीर केला.
ग्रीन एनर्जीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी रिलायन्स न्यू एनर्जी कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. गुजरातच्या जामनगर येथे ५००० एकर जागेवर धीरुभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी सुरु आहे. रिलायन्सने १०० गिगावॅट सौरउर्जेचे उत्पादन करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
याशिवाय, न्यू मटीरिअम आणि ग्रीन केमिकल्स यासंदर्भातही रिलायन्सकडून विचार सुरु आहे. हायड्रोजन आणि सोलर इको सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी रिलायन्सकडून जागतिक दर्जाचा कार्बन फायबर प्लांट विकसि करण्यात येणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.
या बैठकीत रिलायन्सकडून अपेक्षेप्रमाणे ५ जी स्मार्टफोन लाँच करण्यात आला. रिलायन्स आणि गुगल यांनी संयुक्तपणे या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर १० सप्टेंबरला हा फोन बाजारपेठेत येईल.
हे ही वाचा:
मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे
स्वबळाची भाषा करणारे नाना पटोले दौरा अर्धवट टाकून दिल्लीला
हा देशातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा वेग जास्त असेल. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होतील, असा दावा यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाईल यांनी केला.
जिओ फोन नेक्स्ट या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण ४००० रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.