उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते- परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे, असं ठरावात म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.
हे ही वाचा:
मॅकॅफी अँटीव्हायरसचे संस्थापक जॉन मॅकॅफी आढळले मृतावस्थेत
नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु
ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय
कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.