गेले वर्षभर कोविडमुळे आपल्या आयुष्यात अनेक मोठे बदल करावे लागले आहेत. त्यामध्ये अनेक नोकरदार लोकांना घरून काम करावे लागले आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे वर्ग देखील ऑनलाईन सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात शिक्षकांची गुगलने निर्माण केलेल्या व्यासपीठांना अधिक पसंती दिली गेली असल्याचे समोर आले आहे.
प्राध्यापकांनी कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणासाठी गुगलचा आधार घेतला आहे. विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यापीठाने देखील लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम या नावाची एक यंत्रणा तयार केली होती. परंतु त्यापेक्षा गुगलच्या व्यासपीठाला प्राध्यापकांनी अधिक पसंती दर्शवली आहे. या प्रणालीला त्यामुळे तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे.
हे ही वाचा:
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?
निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन
भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे करोनाच्या प्रादुर्भावात देण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेणारे सर्वेक्षण करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि विद्यापीठाच्या ई-कंटेट डेव्हलपमेंट विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांच्या प्रयत्नातून या सर्वेक्षणात ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केलेल्या प्राध्यापकांची याबाबतची मते जाणून घेण्यात आली होती. त्याबरोबरच विद्यार्ध्यांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले होते.