अंधेरी पूर्व चांदीवली येथील नहर अमृतशक्ती या ठिकाणी भाडेतत्वावर राहणाऱ्या एका मातेने आपल्या सात वर्षाच्या मुलासह १२व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीचा नुकताच कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
पतीच्या मृत्यूनंतर इमारतीत राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
कृषी विभागात ‘वाझे’कडून कोट्यवधींची वसुली सुरु
हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब स्फोट
मुख्यमंत्र्यांची आधी संमती, मग स्थगिती! आव्हाडांचा दावा
परप्रांतीय पुन्हा वळले मुंबईकडे
रेश्मा ट्रेंचिल (४४) या असे या मातेचे नाव आहे. रेश्मा ही पती आणि मुलगा गरुड यांच्यासह एप्रिल महिन्यातच नहर अमृतशक्ती येथील ट्युलिपीया या इमारतीच्या १२व्या मजल्यावर भाडेतत्वावर राहण्यास आले होते. मे महिन्यात रेश्मा हिच्या पतीचे कोरोनामुळे मृत्यु झाला होता, पतीच्या निधनामुळे रेश्मा खचलेली होती, त्यात खालच्या मजल्यावरून राहणाऱ्या मोहम्मद आयुब खान, शादाब खान आणि शहनाज खान हे तिला मानसिक त्रास देत होते.
मुलगा फ्लॅटमध्ये खेळतो म्हणून आम्हाला त्याच्या आवाजाचा त्रास होत असल्याचे सांगून खान कुटुंब सतत सोसायटी तसेच पोलीस ठाण्यात आमच्या विरुद्ध तक्रार करीत होते. या कारणावरून तिने मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुलासह १२ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी रेश्मा हिने लिहलेल्या चिठ्ठीत तिने खान कुटुंबियांचा उल्लेख केला आहे. यावरून साकिनाका पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.