दीड कोटीवरून ४७ कोटींची उडी
मुंबई महापालिका टक्केवारी घशात घालण्यासाठी कुठला खर्च कसा वाढवेल हे सांगता येत नाही. नद्यांमधील गाळ काढण्यासाठी आता पालिकेने दीड कोटींवरुन चक्क ४७ कोटींवर उंच उडी घेतलेली आहे. नदीतील कचरा राहिला बाजूलाच, पण पालिकेची ही कोट्यावधींची उडीच आता सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झालेली आहे. पावसाळा येण्याआधी करण्यात येणारी नालेसफाई तर झालीच नाही. पालिकेचे नालेसफाईचे दावे फोलच ठरले. आता ४७ कोटींचा चुराडा करुन पालिका नवे काय साध्य करणार हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
नदी नाल्यातील कचरा अडविण्यासाठी ट्रॅश ब्रूम बसवले जाते. ट्रॅश ब्रूमच्या माध्यमातून कचरा अडविण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. तीन वर्षांपूर्वी पालिकेने हा प्रयोग राबविला होता. तीन वर्षांपूर्वी ज्या नद्या होत्या त्याच नद्या यंदाही आहेत. फक्त तीन वर्षांपूर्वीचा दीड कोटींचा खर्च आता फक्त ४७ कोटींवर गेलेला आहे. म्हणजे ही इतकी टक्केवारी पालिका मधल्या मध्ये लाटण्याच्या विचारात आहे. कोटीच्या भावात टक्केवारीची गणिते पण वाढतात, त्यामुळे पालिका कोटींच्या उड्डाणात एकदम माहीर झालेली आहे.
हे ही वाचा:
हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब स्फोट
मुख्यमंत्र्यांची आधी संमती, मग स्थगिती! आव्हाडांचा दावा
युरो कप: इंग्लंड, क्रोएशिया पुढल्या फेरीत दाखल
निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन
नद्या आणि नाल्यांच्या माध्यमातून तरंगता कचरा समुद्रामध्ये पोहोचतो म्हणून पालिका ही खबरदारी घेत आहे. पालिका करत असलेला हा खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात फुगवल्यामुळे आता विरोधी पक्षाने या खर्चासाठी कडाडून विरोध दर्शविला आहे.
यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणतात, आधीचा प्रयोग किती यशस्वी होता याची प्रशासनाने आधी माहिती द्यावी. त्यानंतरच आत्ताचा प्रयोग राबवायला हवा. नालेसफाईच्या कामांवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही दरवर्षी मुंबईची तुंबई होतेच. मग हा प्रयोगतरी खात्रीशीर आहे का याची आधी पालिकेने माहिती द्यावी मगच हा प्रयोग राबवावा असे मत भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.