आयएसआयच्या पैशातून सुरू होते षडयंत्र
उत्तरप्रदेशातून धर्मांतराचे एक मोठे रॅकेटच आता उघडकीस आलेले आहे. उत्तरप्रदेश एटीएसने लखनौ येथून २ मौलांनाना अटक केली आहे. अटक केलेल्या मौलांनाकडून या धर्मांतराची माहिती पुढे आलेली आहे. उत्तरप्रदेश व्यतिरिक्त इतर राज्यांत पैशाचे, नोकरीच्या आणि लग्नाच्या बहाण्याने धर्मांतरीत करण्याचा हा डाव मौलाना आखायचे. या दोन्ही मौलानांवर एक हजाराहून अधिक हिंदूंचे मुस्लीम धर्मामध्ये धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यांना आयएसआय व परदेशातून वित्तपुरवठा करण्यात येत होता. एटीएसची टीम जवळपास चार दिवस त्यांची चौकशी करून पुरावे गोळा करीत होती. या दोन्ही मौलानांनी प्रामुख्याने महिला आणि मूकबधिरांना सर्वात आधी लक्ष्य केले. धर्मांतर केलेल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मूकबधिरांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
यूपीएला बाजुला ठेवत राष्ट्रमंच नावाची तिसरी आघाडी
त्या भेटीचा अर्थ हाच की, पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय
प्रदीप शर्मा आणि अन्य चौघांच्या समोर सुनील मानेची चौकशी
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसुद्धा त्यांना वित्तपुरवठा करीत होती. एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
ते म्हणाले की, हे दोन्ही आरोपी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी हे दिल्लीतील जामिया नगर भागातील रहिवासी आहेत. यूपी व्यतिरिक्त दोन्ही आरोपींवर अन्य राज्यातही धर्मांतर केल्याचा आरोप आहे. लोक गरीब हिंदूंना लक्ष्य करतात आणि आतापर्यंत एक हजाराहून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आलेले आहे. मुस्लिम धर्माचा स्वीकार करणाऱ्या १००० महिला आणि मुलांची यादी आता पोलिसांना आढळली आहे. कानपूर, बनारस आणि नोएडा येथील स्त्रियांचा आणि मुलांचा समावेश आहे. हे दोन्ही मौलाना दावा इस्लामिक सेंटर अशी संस्था चालवतात.
३ जूनला यांनी दिल्लीमध्ये दासना मंदिरात दोन मुस्लिम मुलांनी पुजारी एकटा आहे बघून त्यावर हल्ला केला होता. त्यातूनच हा सर्व प्रकार उघडकीस आला. तपास सुरू झाल्यावर या दोन्ही मौलानांचे सत्य बाहेर पडले. एकूणच या संपूर्ण प्रकरणाबद्दल पोलिसांचा अजून तपास सुरू आहे.