अवघ्या काही महिन्यांवर महापालिकेची निवडणूक असताना, पालिकेच्या एकूणच कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत. शहरातील १६ ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची पालिकेच्या योजनेमध्ये ३० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भुर्दंड पालिकेला बसलेला आहे. ३० कोटींचा भुर्दंड पालिकेला बसला यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार करण्यात आलेली आहे.
खरे तर, ८५० लिटरच्या ऑक्सिजन निर्मिती यंत्रासाठी ६५ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. पण एप्रिल महिन्यात सुमारे ८६ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रियेत मेसर्स हायवे कंपनीने ९२.८५ कोटींची रक्कम सांगितली. वाटाघाटी करत ९.२ कोटी सवलत दाखवली. इतकी सवलत दाखवत हे काम ८३ कोटीस देण्यात आले. याकरता मुख्यमंत्री कार्यालयातूनच सूत्रे हलविण्यात आलेली होती.
हे ही वाचा:
भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!
लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!
महावितरण महाअडचणीत; ९१२ कोटींचा विलंब आकार भरण्यासाठी पैसे नाहीत
लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!
अनिल गलगली यांनी माहिती हक्काच्या माध्यमातून दाखल केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार, हे काम ८३ कोटीला देण्यात येणार आहे. ही निविदा काढण्यापूर्वी पालिकेने आयआयटी किंवा अन्य सापेक्ष तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या संस्थेकडून मार्गदर्शन घेतले आहे का? या प्रश्नावर मात्र कुठलेच उत्तर मिळाले नाही. या सर्व ऑक्सिजन निर्मिती यंत्रणेचे पुरवठा आणि इतर तत्सम खर्चाची रक्कम ही केवळ ७७.१५ कोटी दाखविण्यात आली. यावर वार्षिक प्रचलनावर १.३१ कोटी रुपये दाखविण्यात आले. संधारण व परिरक्षणावर ५.३६कोटी असे सर्व मिळून अखेर ८३.८३ कोटी रक्कम निश्चित करण्यात आली.
वास्तविक पाहता या प्रकल्पावर ३० कोटी हे ज्यादा खर्च केले जात आहेत. टक्केवारीची गणिते मोजून मापूनच महापालिकेने हा खर्च दाखविलेला आहे हे आता सिद्ध झालेले आहे. भाजपने केलेल्या आरोपानुसार हा प्रकल्प खर्च २५ ते ३० कोटींचा असताना महापालिकेने अंदाजे ८६ कोटी रुपये खर्च होईल असा दावा केला होता. एकूणच काय तर, आता महापालिकेचे अनेक दावे फोल ठरले आहेत. त्याचबरोबर पालिकेचा हा ३० कोटींचा घोटाळाही आता जनतेसमोर आलेला आहे.