27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषखारफुटींची कत्तल करून बांधला दोन किलोमीटरचा रस्ता

खारफुटींची कत्तल करून बांधला दोन किलोमीटरचा रस्ता

Google News Follow

Related

टाळेबंदी कशी कुणाच्या पथ्यावर पडली हे सांगायलाच नको. टाळेबंदीच्याच काळात भूमाफियांकडून मुंब्रा ते दिवा या भागातील खारफुटींची कत्तल करून त्यावर चक्क दोन किलोमीटरचा रस्ताच बांधण्यात आला. टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना हे आदेश दिलेच कुणी असा सवाल आता उपस्थित झालेला आहे.

एकूणच पर्यावरणाचा होत असलेली हानी पाहता हा झालेला प्रकार पाहून पर्यावरणप्रेमींचा संताप आता अनावर झालेला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री हे आदित्य ठाकरे आहेत त्यांना घडलेल्या प्रकाराची जाण तरी आहे का? जनतेसमोर केवळ बेगडी पर्यावरणप्रेमींची भुमिका वठवणारे हे सरकार पर्यावरणाची जपणूक दूरच सत्यानाशच करत आहे.

हे ही वाचा:
काँग्रेसला पुन्हा स्वबळाची आठवण

कोरोनामुळे त्या वकिलांनी सोडला पेशा

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन

प्रताप सरनाईक मातोश्रीवर?

राज्यसरकारकडून या खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे क्षेत्र हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. मग तरीही हा असा प्रकार घडतो, म्हणजे वरुनच याला वरदहस्त आहे हे सिद्ध होते. या खाडीचा काही भाग हा फ्लेमिंगो अभयारण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे.

खारफुटींची कत्तल करुन मुंब्रा येथील देसाई खाडीत हा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आलेला आहे. मुळातच खारफुटीचे रक्षण करणे हेच उत्तम पर्यावरणाचे प्रतिक आहे. खारफुटीमुळे पुराचा धोका कमी होतो, परंतु या अशाप्रकारे खारफुटींच्या कत्तल होणे म्हणजेच आपण पर्यावरणाविषयी किती सतर्क आहोत हेच आपल्याला समजते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भविष्यामध्ये मुंबईसह उपनगरातील खाड्या या आक्रसु लागलेल्या आहेत हे समोर आले आहे. दिवसागणिक पर्यावरणाची होत असलेली हानी ही येणारा काळ अधिक कठीण असेल याचीच ग्वाही आज देत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली ही खारफुटींची कत्तल या विभागात पहिल्यांदाच झाली आहे असे स्थानिकांचे म्हणजे आहे. भुमाफियांना वरूनच वरदहस्त असल्यामुळे त्यांना बोलण्यास कुणीही पुढे येत नाही. मुख्य म्हणजे स्थानिक प्रशासन या सर्व गोष्टींकडे करत असलेला कानाडोळा हे असे प्रकार होण्यास भाग पाडतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा