बोईंग या विमान उत्पादक कंपनीने बोईंग ७३७ मॅक्स या श्रेणीतील नवे विमान तयार केले असून, त्याने पहिले उड्डाण केले आहे. शुक्रवारी या विमानाने सिआटल येथून दोन तासांच्या अपेक्षित फेरीसाठी उड्डाण केले. या विमानाकडून बोईंग कंपनीला मोठ्या अपेक्षा आहेत.
नवे मॅक्स १० हे सध्या वापरात असलेल्या इतर बोईंग मॅक्स विमानांपेक्षा किंचित मोठे आहे. याची प्रवासीक्षमता २३० इतकी आहे. बोईंगची युरोपातील प्रतिस्पर्धी एअरबस या कंपनीच्या ए३२१ या विमानाला आव्हान देण्यासाठी मॅक्स १० विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. बोईंग कंपनीला मॅक्स १० विमान वाहतूक कंपन्यांना २०२३ पर्यंत पुरवठा करण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
आता मुंबईकर मतदार शिवसेनेला धडा शिकवेल
कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट
१२ ते १८ वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस येणार?
मुंबईत निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारकडे मागणी
बोईंगच्या ७३७ श्रेणीतील इतर विमानांपेक्षा हे विमान कमी इंधनात अधिक अंतर कापून जाऊ शकते. विमान प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी २०१७ मध्ये मॅक्स श्रेणीतील विमानांचा वापर करायला सुरूवात केली होती, परंतु ऑक्टोबर २०१८ आणि मार्च २०१९ मध्ये मॅक्स ८ आणि मॅक्स ९ या विमानांचा अपघात झाला होता. त्यामुळे या श्रेणीच्या सर्व विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. या अपघातांत एकूण ३४६ लोकांचा मृत्यु झाला होता.
या अपघातानंतर संपूर्ण मॅक्स श्रेणीची उड्डाणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर अपघातांमागची कारणे शोधण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेतील शोधकर्त्यांनी या विमानांना उड्डाणासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. बोईंगने देखील त्यांच्या तंत्रज्ञानात आवश्यक ते बदल करून विमाने अधिक सुरक्षित केली होती.