रस्त्यांवरून होणारी वाहतूक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने केंद्राने काही महत्त्वाची पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रस्त्यांवरील अपघात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना अर्ध्याहून अधिक अपघात हे अभियांत्रीकीमुळे घडत असल्याचे प्रतिपादन केले होते.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी आयोजित केलेल्या रस्त्यांवरील अपघात रोखण्यातील कॉर्पोरेट्सचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रात बोलताना केंद्रीय मंत्री यांनी सफर या रस्ता सुरक्षेवरील गटाच्या स्थापनेबद्दल कंपन्यांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा:
फडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट
२६ जूनला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्का जाम आंदोलन
मोदींचा डंका कायम! ठरले जगातील सर्वोत्कृष्ट नेते
यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्स (अपघाती क्षेत्र) कमी करण्यावर भर देणार असल्याचे देखील सांगितले. त्यासाठी प्रत्येक राज्यातील ब्लॅक स्पॉट्स शोधण्याचे कार्य देखील करणार असल्याचे सांगितले. या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग संघटन राज्यांना १४,००० कोटी रुपये ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मंत्री महोदयांनी यावेळी बोलताना सांगितले की, त्यांचे मंत्रालय रस्त्यांच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक कार्यरत राहणार असल्याचे देखील सांगितले. त्याबरोबरच अर्ध्याहून अधिक अपघात अभियांत्रिकी कारणांमुळे होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. २०२४ पर्यंत रस्ते अपघात अर्ध्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.