31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष'शिकाऊ' लायसन्ससाठी दलालांची चांदी

‘शिकाऊ’ लायसन्ससाठी दलालांची चांदी

Google News Follow

Related

कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली आता परिवहन खात्यानेही काही नियम लागू केले. या नवीन नियमांतर्गत आता शिकाऊ वाहनचालक घरबसल्या परीक्षा देऊ शकणार असे ठरले. परंतु या सर्व बाबतीत घडत आहे काही वेगळेच, अर्जदार बाजूलाच राहिले परीक्षेला दलाल बसत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे . केवळ दलालच नाही तर, परिचितांकडून सुद्धा परीक्षा देण्यात आल्याचे दिसत आहे. या सुविधेचा गैरवापर केल्याप्रकरणी आता या पद्धतीमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून कळते.

शिकाऊ वाहनचालकांना घरबसल्या परवानगी दिल्यामुळे अनेक दलालांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. केवळ इतकेच नाही तर वाहनचालक संघटनाही या सर्व गोष्टींमध्ये आता हात धुवून घेत आहेत. अर्जदाराकडून जास्त रक्कम वसूल करून त्याला लायसन्स मिळवून देण्याकडे दलालांचा कल वाढलेला आहे.

हे ही वाचा:

भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही नाही !

शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन

व्हेल माशाची ‘उलटी’ विकणारे तिघे जाळ्यात

फडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं

शिकाऊ लायसन्सची परीक्षा देताना अनेकांना सोप्या प्रश्नाची उत्तरेही देता येत नाहीत. परंतु केवळ लायसन्स हातात यावे म्हणून ते अर्जदार आपल्या ओळखीपैकी कुणालातरी परीक्षेला बसवतात असेच आता पुढे येत आहे. यामुळेच आता हा मुद्दा ठळकपणे समोर आलेला आहे. आता परिवहन खात्यालाच या एकूण परीक्षेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची वेळ आलेली आहे.

अर्जदारांच्या जागी अनेक दलाल परीक्षेला बसल्याची बाब आता लक्षात आली आहे. वाहनचालक परवाना परीक्षेसाठी १५ प्रश्न प्रत्येक अर्जदाराला सोडवावे लागतात. या १५ प्रश्नांमधील किमान ९ प्रश्नांची उत्तरे येणे आवश्यक असते. परंतु अर्जदारच ही परीक्षा देतो की, नाही हे मात्र माहीत नसते. त्यामुळेच आता आरटीओकडून चौकशी करण्यात येत आहे. केवळ आधार कार्ड आणि अर्जदाराची माहिती व छायाचित्र ही परीक्षा देण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे नेमके परीक्षेस कोण बसले आहे या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा