28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषआधी मदत द्या, मगच तिसरी घंटा वाजणार

आधी मदत द्या, मगच तिसरी घंटा वाजणार

Google News Follow

Related

मराठी माणूस हा नाट्यवेडा आहे हे सर्वश्रुत आहेच. परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यव्यवसायही चांगलाच कोलमडला. अनेक नाटकांचे प्रयोग न झाल्याने यावर उपजीविका करणारे तंत्रज्ञ आणि कलाकार यांचे चांगलेच नुकसान झालेले आहे. सरकारदरबारी मदत मागूनही मदत मिळेनाशी झालेली आहे. म्हणूनच आता रंगमंच कामगारांनी असहकाराचा मार्ग अवलंबिला आहे. राज्य सरकार जोपर्यंत रंगमंच कामगारांना आर्थिक मदत करणार नाही, तोपर्यंत तिसरी घंटा आता वाजणार नाही. नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा निर्णय आता रंगमंच कामगार संघाने घेतलेली आहे.

गेल्या दीड वर्षामध्ये ठाकरे सरकारकडून केवळ मदतीचे आश्वासन मिळत आहे. प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही. त्यामुळेच अखेर रंगमंच कलाकारांना असहकाराचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे. ठाकरे सरकार केवळ तोंडावर मनोरंजन सृष्टीचा कैवार घेतात, पण प्रत्यक्षात मदत करताना कुठलीही पावले उचलत नाहीत. असे आता रंगमंच कामगार संघटनेचे ठाम मत झालेले आहे. त्यामुळे आता आम्हाला वाली कोण? आमचे प्रश्न ऐकणार तरी कोण असे या कामगारांना वाटू लागलेले आहे. त्यामुळेच अखेर कामगार संघटनेने बैठक घेऊन त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट

२६ जूनला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्का जाम आंदोलन

मोदींचा डंका कायम! ठरले जगातील सर्वोत्कृष्ट नेते

यासंबंधीत कामगार संघटनेने मागण्यांचे पत्रही शासनदरबारी दिलेले आहे. तसेच एक पत्र अखिल भारतीय नाट्य परिषदेशी जोडल्या गेलेल्या संस्थांनाही देऊ केले आहे. रंगमंच कामगारांकडून हे पाऊल नाईलाजाने उचलले गेल्याचे रत्नकांत जगताप यांनी सांगितले आहे. रंगमंच कामगार संघाचे प्रवक्ते म्हणून रत्नकांत जगताप म्हणाले, आज मदतीसाठी आम्हाला सरकारकडे अट्टहास करावा लागत आहे. पण आमच्यावर ही वेळ सरकारमुळेच आलेली आहे.

व्यवसाय सुरळीत होईपर्यंत सरकारकडून दरमहा किमान ५ हजारांचे अर्थसहाय्य मिळावे. रंगमंच कामगार संघाने केलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने ही मागणी करण्यात आलेली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास नाट्यप्रयोगासाठी कामगार जाणार नाही, असा ठाम पवित्रा आता रंगमंच कामगार संघाकडून घेण्यात आलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा