बोरिवली पश्चिमेकडील पुलाचा वाद सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. कल्पना चावला चौक येथील उड्डाणपुल विस्तारित कामात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे या पुलाची चर्चा सर्वत्र होती. या पुलाच्या खर्चामध्ये तब्बल ३५० टक्क्यांनी वाढ होत असल्यामुळे हा प्रकल्प चर्चेत होता. पालिकेने ३५० टक्के यात दाखवलेली वाढ हा पालिकेच्या टक्केवारीचा एक उत्तम नमुनाच म्हणायला हवा. पालिकेने सुरुवातीस या प्रकल्पास १६१ कोटी मंजूर केले होते. मात्र हा खर्च नंतर ४६१ कोटी रुपयांपर्यंत वाढीव दाखविण्यात आला. यावरून मोठा वादंग निर्माण झाला.
मुंबई पालिका प्रशासनाकडून विविध स्वरूपाचे प्रस्ताव तयार केले जाऊन स्थायी समितीकडे मांडले जातात. अखेर स्थायी समितीने एकमताने हा पुलाचा प्रस्ताव फेटाळून लावला.
हे ही वाचा:
‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’
शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही
शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती निवडणुकीपूर्वीचीच
मराठा, ओबीसींच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारने मोठं षडयंत्र रचलं
एखाद्या प्रस्तावावर १० टक्के वाढीव खर्च हा समर्थनीय ठरू शकतो. परंतु ३५० टक्के वाढ अयोग्य असल्याचे मत एकमताने झाले. पालिकेने सादर केलेला हा प्रस्ताव म्हणजे पालिकेच्या मनमानी कारभाराचा एक उत्तम नमुनाच आहे. ३५० टक्क्यांनी वाढीव खर्च दाखविणे हे आश्चर्यकारक आहे.
एखाद्या योजनेसाठी ३५० टक्के वाढीव खर्च दाखविण्याच्या प्रकारामुळे त्यावर प्रचंड गदारोळ होणार असल्याची अटकळ होती. पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पालिकेने दाखवलेल्या ३५० टक्के वाढ अत्यंत चुकीची आहे. त्यापेक्षा नवीन निविदा मागवून उड्डाणपूल बांधणे योग्य ठरेल असे मत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले.