एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे वारंवार सांगितले जात असले आणि या परिस्थितीत डॉक्टर, नर्स यांची गरज असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा दोन महिन्यांसाठी खंडित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यावर मुंबई भाजपाने जोरदार टीका केली आहे.
एका बाजुला तिसऱ्या लाटेचा धोका सांगतात आणि पाच हजार डॉक्टर्स-नर्सना कामावरून काढूनही टाकतात. उद्याचा विचार करण्याची सरकारची शक्तीच खुंटली आहे. रुग्णसंख्या पुन्हा वाढली, तर भरतीची सरकारी वेळकाढू प्रक्रिया पूर्ण करत रुग्णांना मरणाच्या दारात ढकलणार का?
मुख्यमंत्री @OfficeofUT तिसऱ्या लाटेचा धोका सांगतात व पाच हजार डॉक्टर-नर्सना कामावरून काढूनही टाकतात. उद्याचा विचार करायची सरकारची शक्तीच खुंटलीय. रुग्णसंख्या पुन्हा वाढली, तर भरतीची सरकारी वेळकाढू प्रक्रिया पूर्ण करत रुग्णांना मरणाच्या दारात ढकलणार का? #MahaCovidFailure pic.twitter.com/sw7ZkrpfPv
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 17, 2021
पालिकेने कोरोना केंद्रांसाठी कंत्राटी पद्धतीने २७७६ डॉक्टर आणि २४५१ परिचारिका अशा पाच हजार जणांची नियुक्ती केली होती.पालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर रुग्णालयांसह इतरही कोरोना केंद्रातील खाटा अपुऱ्या पडू लागल्या तेव्हा आयसीयू, ऑक्सिजन, व्हेटिंलेटरची व्यवस्था असलेली कोविड केंद्रे सुरू करण्यात आली. पण त्यासाठी डॉक्टर, परिचारिका यांची गरज होती. म्हणून कंत्राटी पद्धतीने अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली. पण आता या सगळ्यांना दोन महिन्यांसाठी सेवेतून मुक्त करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देण्यात आलेला इशारा पाहता कंत्राटी पद्धतीने नेमलेले डॉक्टर, परिचारिका यांची पुन्हा नियुक्ती केली जाईल, असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.