25 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषवेळ वाढवा! मुंबईतील ४० टक्के उपाहारगृहे बंद

वेळ वाढवा! मुंबईतील ४० टक्के उपाहारगृहे बंद

Google News Follow

Related

कोरोनाने राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. राज्यामध्ये टाळेबंदीचा परिणाम अनेक व्यवसायांवर झालेला आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे उपाहारगृहे. सध्या उपाहारगृहे सुरु आहेत परंतु केवळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतच. त्यानंतर केवळ घरपोच सेवा देण्यात येत आहे. धंद्यामध्ये मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळेच, मुंबईतील जवळपास ४० टक्के उपहारगृहे कायमस्वरूपी बंद झालेली आहेत. यामध्ये पोळी भाजी केंद्र यासारख्या घरगुती उद्योगांवरही गंडातर आलेले आहे. त्यामुळेच आता उपाहारगृहांची वेळ वाढवावी, अशी मागणी व्यावसायिकांकाडून जोर धरत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात याक्षणाला जवळपास ७५ हजार लहानमोठे उपाहारगृहे आहेत. यामध्ये कोरोना काळात हलाखीच्या परिस्थितीत ४० टक्के म्हणजेच सुमारे ३० हजार उपाहारगृह, धाबे टाळेबंदीच्या निर्बंधामध्ये कायमस्वरूपी बंद पडले आहेत.

हे ही वाचा:

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

महापौरांच्या धमक्यांनी भेकडसैनिक घाबरत असतील, आम्ही नाही!

‘ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले’…ठाण्यात लागले बॅनर

शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

अनेक उपाहारगृहे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या घटकांनाही बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. ३० हजार उपाहारगृहातील तीन लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इतकेच नाही तर या उपहारगृहांना मालाचा पुरवठा करणारे उद्योगही आता बुडाले आहेत. त्यामुळे या उद्योगांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

व्यवसाय टिकविण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी उपहारगृह असोसिएशनने केली आहे. मागणीत मोठ्या प्रमाणावर घट आल्यामुळे धंद्याचे नुकसान झालेले आहे. तसेच वाढता कर्जाचा डोंगर, कर्मचारी वर्गाचे वेतन, कर या विविध समस्यांना तोंड देता देता उपहारगृह मालक वेठीस आले आहेत.

मुंबईसह सद्यस्थितीत राज्यातील २ लाख उपहारगृहांपैकी ५० टक्के उपहारगृहे कायमस्वरूपी बंद आहेत. तर गेल्या टाळेबंदीनंतर या क्षेत्रामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करून उपहारगृहे रात्री ११ पर्यंत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत करमाफी मिळावी अशीही मागणी यावेळी संघटनेने केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा