राज्यातील फ्रंट लाईन वर्कर्सचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच करताना दिसतात. परंतु असे सर्व असतानाही फ्रंट लाईन वर्कर्स आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये काम करत असलेल्या परिचारिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पदभरती, कोविड भत्ता, पदोन्नती, रजा त्याचबरोबर इतर प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना काळात फ्रंट वर्कर्स म्हणून परिचारिकांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. अहोरात्र सेवा देताना या परिचारिकांचे आरोग्यही अनेकदा धोक्यात आलेले आहे. आरोग्याची कुठलीही भीड भाड न बाळगता परिचारिका नेहमीच आपल्याला कार्यतत्पर दिसलेल्या आहेत. परंतु त्यांचेही अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळेच आता परिचारिका संघटनांनी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले आहे. कोविड काळात परिचारिकांनी दिवस रात्र काम केले. तरीही त्यांना अजूनही कोविड भत्ता देण्यात आलेला नाही.
हे ही वाचा:
सोनियांच्या प्रभावामुळे शिवसेना राज्यात फॅसिझम राबवतेय काय?
जमीन खरेदी विषयावरून राम मंदिर विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार
अँटीबॉडी कॉकटेल म्हणजे नेमकं काय?
सरकारी कर्मचारी सरकारविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत
राज्यामध्ये असलेल्या बहुसंख्य सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिकांची संख्या कमी आहे. तसेच अनेक वर्षे रिक्त पदे भरलीही गेली नाहीत. त्यामुळे सेवेत असणारा परिचारिका वर्ग हा भरडला जातोय. सेवेत असणारा परिचारिका वर्ग कामाच्या तणावातून जाताना दिसत आहे. त्यामुळे परिचारिकांनी आता ही रिक्त पदे भरून इतर सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी सरकारकडे केलेली आहे.
आंदोलनांतर्गत दोन दिवस दोन तास काम बंद तसेच दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, मग २५ जूनपासून परिचारिका बेमुदत संपावर जाणार आहेत, असा इशारा आता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिलेला आहे. या मागण्यांसाठी संघटनेने उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रही पाठविले आहे.