27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामामूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल

मूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल

Google News Follow

Related

सुट्टीवर घरी निघालेल्या भारतीय सैन्य दलातील एका इंजिनियरचे सामान चोरी करून पळून गेलेल्या चोराला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक तर केली, मात्र त्याला बोलतं करण्यासाठी अखेर पोलिसांनी मूकबधिर शाळेच्या शिक्षकाची मदत घ्यावी लागली. अटक करण्यात आलेला चोर हा लहानपणापासून मूकबधिर असल्यामुळे त्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांना प्रथम खूप मेहनत घ्यावी लागली होती. अखेर मूकबधिर शाळेच्या शिक्षकानेच त्याला बोलतं केल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

अकोला येथे राहणारे संतोष गायकवाड (३५) हे भारतीय सैन्य दलात इंजिनियर या पदावर आहेत. त्यांची नेमणूक सध्या जम्मू येथे असून ८ जून रोजी गायकवाड हे सुट्टीवर आले होते. मुंबईहून अकोला येथे जाण्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशी ट्रेन असल्यामुळे रात्री ते मुंबई सेंटर रेल्वे स्थानकांवरच काढली. त्या दरम्यान त्यांना झोप लागली असता चोरटयांनी त्याच्याजवळील सामानाची चोरी करून पोबारा केला होता.

हे ही वाचा:

अबब…वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला मिळणार एवढे कोटी रुपये

विधानपरिषद सदस्य यादीच्या उपलब्धतेचे कोडे सुटणार?

मराठा आरक्षणासाठी ३६ जिल्ह्यात मेळावे घेणार

जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…

या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी ताबडतोब या गुन्हयाचा तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरिक्षक सुनील डोके यांच्या पथकाला सूचना दिल्या.
पोलीस उपनिरक्षक डोके आणि त्याच्या पथकाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग घेऊन भांडुप येथून अलीम उर्फ तुषार(३३) याला अटक करण्यात आली.

अलीम उर्फ तुषार हा मूकबधिर असल्यामुळे पोलिसांना त्याला बोलतं करण्यासाठी अखेर वांद्रे येथून मूकबधिर शाळेच्या शिक्षकाला बोलावून त्याने चोरी केलेल्या सामानाची माहिती गुन्हयाची कबुली करून घेतली. पोलिसांनी त्याने दिलेल्या कबुलीवरून त्याला अटक करून त्याच्या घरात दडवून ठेवलेला २१ हजार रुपयाचा ऐवज हस्तगत केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इनामदार यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा