‘ब्राऊनी केक’ मधून हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका बेकरीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई करून तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. एनसीबीने जप्त केलेल्या ८३० ग्रॅम वजनाच्या ब्राऊनी केकमधून १६० ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा जप्त केला आहे.
ब्राऊनी केक मधून गांजाचे सेवन करण्याचा भारतातील हा नवीन ट्रेंड असून हा ट्रेंड तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याची माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
तो मी नव्हे म्हणणाराच निघाला आरोपी
आशा सेविकांचा ठाकरे सरकारविरूद्ध संपाचा एल्गार
मुंबईत फहिमची ‘मचमच’ वाढली; निशाण्यावर व्यवसायिक आणि बिल्डर
मुंबईत एसटी बंद; लोकांच्या त्रासात भर
मालाड पश्चिमेतील ऑर्लेम परिसरात एका बेकरीमध्ये गांजा युक्त ब्राऊनी केकचे पॉट तयार करून त्याची डिलिव्हरी हायप्रोफाइल सोसायट्यामध्ये केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी एनसीबीच्या पथकाने एका महिलेसह एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेले १० ब्राऊनी केकचे ८३० ग्रॅमचे १० पॉट ताब्यात घेऊन तपासले असता त्यात १६० ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे.
त्याच्या चौकशीत गांजाने भरलेले ब्राऊनी केकच्या पॉटचा पुरवठा वांद्रे येथील जगत चौरसिया नावाचा व्यक्ती करीत आहे. पोलिसांनी रात्री उशिरा जगत चौरसिया याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून १२५ ग्रॅम गांजा मिळाला. जप्त केलेला गांजा हा सेंद्रिय गांजा असून भारतात या गांजाला सर्वात अधिक मागणी आहे.
एनसीबीने ब्रॉऊनी वीड पॉट केकद्वारे तरुण पिढीतील पदार्थांचे सेवन करण्याचा एक नवीन ट्रेंड शोधून काढला आहे. ब्राऊनी तयार करताना त्यात खाद्यतेलाचा वापर करून त्यात गांजा मिक्स करून ते बेक केले जाते.