25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमराठा आरक्षणावर आमच्यात एकमत

मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत

Google News Follow

Related

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली. तर मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची असल्याचं उदयनराजे म्हणाले. पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका मांडली.

संभाजीराजे म्हणाले की, “आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्याचं घराणं एकत्र आलं याचा मला आनंद आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात.”

“आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. संभाजीराजे यांच्या विचारांशी मी सहमत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणावर राजकारण सुरु आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका,” अशी संतापजनक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. तसंच मराठा आरक्षणासाठी विशेष आंदोलन बोलवण्याची मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा:

एक बातमी आणि अदानी समूहाचे नुकसान

उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांची पुण्यात भेट

चिराग पासवान यांना मोठा धक्का

१२ वर्षानंतर नेतान्याहू सत्तेतून बाहेर

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यभर दौरा केला तसंच अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकवाक्यता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यात आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे चर्चेसाठी एकत्र आल्याने या भेटीकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं होतं. या भेटीत नेमकं काय होतं? आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे काय भूमिका मांडतात याची उत्सुकता लागली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा