31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष१२५व्या वर्षी त्यांनी घेतली लस!

१२५व्या वर्षी त्यांनी घेतली लस!

Google News Follow

Related

वाराणसीला असलेल्या एका लसीकरण केंद्रात रविवारी एक आश्चर्यजनक घटना घडली. स्वामी शिवानंद या लसीकरण केंद्रात आले आणि त्यांनी पहिला डोस घेतला. पण तो घेण्याआधी जेव्हा त्यांचे आधारकार्ड संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

कारण स्वामी शिवानंद यांची त्या आधारकार्डवरील जन्मतारीख ८ ऑगस्ट १८९६ अशी होती. म्हणजेच ते १२५ वर्षांचे आहेत. प्रश्न हा नव्हता की ते इतके वयोवृद्ध होते तर मुद्दा हा होता की, त्यांची नोंदणी कशी करणार? कारण पोर्टलवर १९००मध्ये जन्मलेल्यांचीच नोंदणी होऊ शकत होती. शेवटी १९०० या वर्षातच त्यांचा जन्म झाल्याची नोंद करून त्यांना पहिला डोस देण्यात आला.

दुर्गाकुंड विभागात कबीर कॉलनीत शिवानंद राहतात. त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल ते नेहमीच चर्चेत असतात. शिवानंद जेव्हा या लसीकरण केंद्रावर गेले तेव्हा त्यांना कुणी ओळखू शकले नाहीत. शेवटी तिथे असलेल्या अभाविपची एक स्वयंसेवक साक्षी सिंहने मदत केली. तिने त्यांची नोंदणी केली पण त्यांची जन्मतारीख पाहिल्यानंतर तिलाही धक्का बसला. मग उपस्थित डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यांची नोंदणी केली गेली आणि त्यांना लस टोचण्यात आली.सगळ्यांनी लस घ्या असे शिवानंद यांनी त्यावेळी आवाहन केले.

हे ही वाचा:

ऑक्सिजन एक्सप्रेसची तीस हजारी कामगिरी

मेहबुबा मुफ्तींच्या निकटवर्तीचे दहशतवाद्यांशी संबंध?

वडेट्टीवारांनी पुन्हा केले मुख्यमंत्र्यांचे काम हलके

वन रुपी क्लिनिकचे डॉ. घुले यांना धमकी; पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली मदत

शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ला श्रीहट्ट जिल्ह्यातील हबिगंज महकुमा येथे झाला. ही जागा बांगलादेशात आहे. शिवानंद हे ब्राह्मण कुटुंबात जन्मले आणि भिक्षा मागून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असे. वयाच्या चौथ्या वर्षी शिवानंद यांनी श्री ओंकारनंद गोस्वामी यांच्याकडे आध्यात्माचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आईवडिल आणि बहिणीचे मात्र उपासमारीने निधन झाले. तेव्हापासून ब्रम्हचर्याचे पालन करत ते इतकी वर्षे सुदृढ आयुष्य जगत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा