वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांना राजकीय एजंट कडून धमकीचे कॉल सुरू असून आपल्या जीवाला धोका असल्याचे ट्विट डॉ. घुले यांनी ट्विटर वर केले आहे.तसेच मुंबईत आपण सुरक्षित नसून मी माझ्या कुटुंबियांसह मुंबईतून कायमचे दिल्ली येथे स्थायिक होत असल्याचे त्यांनी ट्विटर वर म्हटले आहे. याप्रकरणी मात्र अद्याप कुठल्याही पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही.
डॉ. राहुल घुले यांचे वन रुपी क्लिनिकचे मुख्य उपचार केंद्र ठाणे रेल्वे स्थानकाला लागून आहे. डॉ.राहुल घुले हे स्वतः या क्लिनिक मध्ये रुग्णांवर उपचार करतात. कोरोनाच्या काळात वन रुपी क्लिनिकने अनेक महानगर पालिकाच्या कोविड सेंटरचे काम बघितले आहे.
हे ही वाचा:
…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई
शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध
पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?
गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली!
वन रुपी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉ. राहुल घुले यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून ‘माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, काही राजकारण्याचे एजंट आपल्या धमकावत आहे असे ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.
डॉ.घुले यांनी काही वेळाने दुसरे ट्विट करून ‘मी माझ्या कुटुंबियांसह मुंबई कायमची सोडून दिल्ली येथे स्थायिक होत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, त्यांना संदेश द्वारे विचारणा केली असता मी सध्या दिल्लीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंदाजे ४ तासांननंतर घुले यांनी आपली दोन्ही ट्विट्स डिलीट केली. यानानंतर त्यांनी आणखीन एक ट्विट करत आपले ट्विटर अकाऊंट डिलीट करत असल्याचे सांगितले. या ट्विटमध्ये घुले यांनी आपला मोबाईल नंबर शेअर केला आहे. पण हा नंबरही स्विच ऑफ येत आहे.
डॉ. राहुल घुले यांना ठाण्यातील क्लिनिक मध्ये असताना धमकीचा फोन आला होता, व त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉ. घुले यांना कोण धमकावत आहे, धमकी देणारे राजकीय एजंट कोण याबाबत काहीही कळू शकलेले नाही. याबाबत अद्याप कुठल्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.