राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा निर्बंध लावले जातील, अशी शक्यता व्यक्त करणारे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आधी घोषणा करण्याची घाई केली आहे. त्यावर भाजपाने त्यांची खिल्ली उडविली आहे.
मुंबई भाजपाने म्हटले आहे की, बोलले…पुन्हा लॉकडाऊनवर बोलले. नव्याने निर्बंध लागू शकतील, अशी भविष्यवाणी केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांसाठीचे साप्ताहिक लाइव्ह इशारे वडेट्टीवारांनीच दिलेत. मुख्यमंत्र्यांचे काम आणखी हलके केले आहे.
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी एकदा पचका केल्यानंतर वडेट्टीवारांची लॉकडाऊनबाबत सुरू असलेली उलट सुलट विधाने म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मी कोणी तरी आहे, माझ्याकडे बघा, हे सांगण्याचा अट्टहास आहे.
हे ही वाचा:
ख्वाजा मेरे ख्वाजा…बीएमसी दिला जा
शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध
पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?
…तर पुन्हा निर्बंध लावले जातील; वडेट्टीवारांची पुन्हा घाई
वडेट्टीवार यांनी नुकतीच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनसंदर्भात वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा मागे त्यांच्याकडून झालेल्या घोळाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी एकदा पचका केल्यानंतर ही @VijayWadettiwar यांची लॉकडाउनबाबत सुरू असलेली उलट सुलट विधाने म्हणजे…
दुसरे तिसरे काही नसून, मी कोणी तरी आहे, माझ्याकडे बघा हे सांगण्याचा अट्टहास आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 13, 2021
मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याआधीच अनलॉकची प्रक्रिया पाच टप्प्यात असेल असे वडेट्टीवार यांनी घोषित केले आणि नंतर ते सावरून धरताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर वडेट्टीवारांनी पाच टप्प्यांत अनलॉकची केलेली घोषणा मुख्यमंत्री कार्यालयातूनच जाहीर होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे मंत्री मुख्यमंत्र्यांआधी सगळी माहिती देण्यासाठी आसुसले असल्याची टीका झाली होती.
बोलले…@VijayWadettiwar पुन्हा लॉकडाऊनवर बोलले. नव्याने निर्बंध लागू शकतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केलीय. मुख्यमंत्री @OfficeofUT यांचे नागरिकांसाठीचे 'साप्ताहिक लाइव्ह इशारे'ही वडेट्टीवारांनीच दिलेत. मुख्यमंत्र्याचं काम आणखी हलकं केलंय. #MahaCovidFailure #तिघाडी_सरकार pic.twitter.com/F6r9QPYECP
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 13, 2021