जेव्हा ३,५०,००० वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवाने आफ्रिकेतून स्थलांतर केले, तेव्हा तो निवासासाठी कोरड्या जागेच्या शोधात निघाला. या भटकंतीत सॅव्हाना गवताळ प्रदेश आणि दक्षिण-पश्चिम वाळवंटी प्रदेशातही मानवाची वस्ती झाली होती. विषुववृत्तीय प्रदेशात अन्न आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी या भागात मोठ्या प्रमाणात डासही आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून मलेरियाचा धोका वाढतो. मग तरीही, त्यावेळच्या दमट आणि उष्ण वातावरणाच्या भारतात ७०,००० मानवी वस्ती कशामुळे वाढली असा प्रश्न संशोधकांना पडला. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्वीच्या भारतीय उपखंडातील मलेरिया सौम्य स्वरूपाचा होता. याबरोबरच भारताला स्वतःची आयुर्वेदाचा स्वतंत्र परंपरा आहे. अशी परंपरा इतर कोणत्याही देशाला नाही. असे क्वाटर्नरी इंटरनॅशनल मध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासाच्या मुख्य लेखिका डॉ.अट्टिला जे ट्रेजर यांनी सांगितले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पॅन्नोनिआने यासाठी ४४९ ऐतिहासिक ठिकाणांहून नमुने गोळा केले, त्यापैकी ९४ ठिकाणे भारतातील होती. या नमुन्यांच्या अभ्यासातून मानवाच्या आफ्रिकेच्या बाहेरील स्थलांतराबद्दल नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मलेरिया वाहक डासांची उत्पत्ती २८.४ ते २३ दशलक्ष वर्षांपूर्वी- मानवाच्या उत्क्रांत होण्यापूर्वीच- झाली होती. मानवाच्या पुर्वजांना केव्हा ना केव्हा मलेरियाचा सामना करावा लागलाच होता. त्यामुळे मानवासोबतच मलेरिया उत्क्रांत झाला असे म्हणण्यास वाव आहे.