फडणवीस सरकारच्या काळात गुलामासारखे जगलो, असे उद्गार खासदार संजय राऊत यांनी काढले. यावर त्यांना अतिशय चपखल उत्तर देऊन माजी अर्थमंत्री आणि भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांची बोलतीच बंद केली.लोकशाहीमध्ये कुणी गुलाम नाही की कुणी राजा नाही असे म्हणत मुनगंटीवार म्हणाले, गुलाम होतात तर मग गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली.
फडणवीस सरकारमध्ये पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही गुलामासारखे आम्हाला वागवले गेले, असे सांगणाऱ्या मुनगंटीवार यांनी राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले. आपली बेईमानी झाकण्यासाठी राऊतांनी गुलाम या शब्दाचा वापर केला असेही ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी दिला ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य’ चा नारा
रशिया विरुद्ध बेल्जियमचा सोपा विजय
पालिकेच्या टक्केवारी कारभाराबद्दल शिवसेनेतच खदखद
मुनगंटीवार यावर अधिक सुस्पष्टपणे म्हणाले, गुलामासारखी वागणूक दिली तर हिंदूह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार खुर्चीसाठी गुलामी करतील का? पाच वर्षे खिशात ठेवलेल्या राजीनाम्यांचे काय? खिशाला चेन होती आणि त्या चेनला कुलुप होते की काय? अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. गुलामाची वागणूक दिली मग राजीनामे एका सेकंदात का फेकले नाहीत, असा खडा सवालच आता मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
बाळासाहेब ठाकरे यांचा विचार इतका कसा कमजोर असू शकतो की, २०१९ च्या निकालाची वाट पाहावी लागली असे अनेक प्रश्न आता मुनंगटीवारांनी शिवसेनेला थेट विचारले आहेत. शिवसेना भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना जी खुर्ची होती तशीच एकनाथ शिंदे यांनाही होती. त्यामुळे गुलामाची भाषा ही योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.
सत्तेत प्रत्येकाला योग्य न्याय त्यावेळी मिळाला होता. मुख्य म्हणजे जनतेची सेवा करण्याची तसेच नागरिकांच्या प्रगतीचा विचार करायचा हाच सत्तेत असणारे विचार करतात. त्यामुळे गुलामीचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.