शनिवार १२ जून रोजी खेळवण्यात आलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात फिनलँडने डेन्मार्कला हरवून आपला पहिला विजय नोंदवला. फिनलँडच्या विजयाने सार्यांनाच धक्का बसला असला तरीही फिनलँड संघाचा विजय हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक विजय ठरला आहे. कारण फिनलँडने पहिल्यांदाच एका मोठ्या फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात विजय संपादन केला आहे.
युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा ब गटातील डेन्मार्क आणि फिनलँड या दोन संघांमधील सामना खूपच नाट्यमय ठरला. या सामन्या दरम्यान डेनमार्क संघाचा महत्त्वाचा खेळाडू क्रिश्चियन एरिक्सन हा मैदानात अचानक कोसळल्यामुळे सामन्यात वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला होता. पण एरिक्सन याची प्रकृती स्थिर असल्याचे समजल्यानंतर हा सामना पुन्हा सुरु करण्यात आला होता. सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर डेन्मार्कने आपले आक्रमण सुरू ठेवले होते. पण मिळालेल्या संधीचे सोने करत फिनलँड संघाचा खेळाडू जोएल पोजनपॅलो यानी आपल्या संघासाठी विजयी गोल मारला.
हे ही वाचा:
संजय राऊत यांनी हे मान्य केलं की त्यांचा वाघ हा पिंजऱ्यातला आहे
स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स आठवा सामनाही अनिर्णीत
डेन्मार्क – फिनलँडचा सामना पुन्हा सुरु
९० मिनिटांच्या या सामन्यात डेनमार्कने सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपली पकड बनवून ठेवली होती. डेन्मार्क संघाकडून २२ वेळा गोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रत्येक वेळेसच ते अपयशी ठरले. खेळाच्या ७४ व्या मिनिटाला तर डेन्मार्क संघाला एक पेनल्टीही मिळाली होती. पण पायर हॉबजर्ग या खेळाडूने ही संधी वाया घालवली.