हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध अशा पुरी येथील जगन्नाथ रथ यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. भगवान जगन्नाथाच्या भव्य अशा रथाच्या बांधणीची सध्या तयारी सुरू आहे. त्यासाठी पुरी येथे अंदाजे २०० मजूर दिवस-रात्र कार्यरत आहेत.
या वर्षी १२ जुलै रोजी भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू होणार असून २० जुलैला देवशयनी एकादशीच्या दिवशी यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या यात्रेसाठी आवश्यक त्या सर्व कामांना सुरुवात झाली आहे. भगवान जगन्नाथाच्या ४२ चाकांच्या रथापैकी ३९ चाके अत्तापर्यंत तयार करण्यात आली आहेत. या कामासाठी २०० मजूर कार्यरत असून कोविड नियमावलीचे पालन करूनच हे काम सुरू आहे. हे सर्व मजूर स्वतंत्र विलगीकरणात राहत आहेत. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांशी कमीत कमी संपर्क येईल याची खबरदारी घेतली जात आहे. पुरीचे जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी याविषयीची माहिती दिली.
We'll conduct Rath Yatra without the presence of devotees, as per Govt orders. It'll be like last year. Everyone who will pull the chariot will undergo RT-PCR test. Strict protocol will be followed. Those sitting at homes can watch the procession online: Samarth Varma, Puri DM pic.twitter.com/FtTcJEZQUJ
— ANI (@ANI) June 11, 2021
हे ही वाचा:
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी
भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप
ही तर पवारांनी काँग्रेसला दिलेली धमकी
यात्रा होणार, पण भाविकांच्या सहभागावर बंदी
देशभर सुरू असलेल्या कोरोना महामारीचा फटका अनेक धार्मिक परंपरांनाही बसताना दिसत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी महाराष्ट्रातील आषाढीची वारी ही साधेपणाने करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तर पुरी येथील जगन्नाथ यात्रेबाबत ही तसाच निर्णय ओरिसा सरकारकडून घेण्यात आला आहे. कोरोनाचे सावट लक्षात घेता पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत भाविकांच्या सहभागावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षीही असाच प्रकारची बंदी ही ओरिसा सरकारकडून घालण्यात आली होती. तर भगवान जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.