देशात कोरोनामुळं नियंत्रणाबाहेर जात असणारी परिस्थती मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी असल्याचं निदर्शास आलं आहे. देशात गेल्या २४ तासांत ३४०३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ९१ हजार ७०२ नव्या कोरोनाबाधितांचं निदान झालं आहे. तर, १ लाख ३४ हजार ५८० कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली आहे. म्हणजेच मागच्या दिवसभरात ४६ हजार २८१ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. याआधी बुधवारी देशात ९४ हजार ५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
सलग २९ व्या दिवशी देशात कोरोनाबाधितांपेक्षा या संसर्गातून मुक्त होणाऱ्यांचा आकडा कमी आहे, ही देशासाठी दिलासादायक बाब. येत्या काळात कोरोना नियमांचं पालन अगदी काटेकोरपणे झाल्यास हा आकडा आणि कोरोनाचा संसर्ग निश्चितच आटोक्यात येईल असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा :
आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही
… की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?
प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर
अजितदादा आणि पत्रकारांची गळचेपी
लसीकरणाच्या बाबतीतही देशातल सध्या चांगलं चित्र दिसत आहे. मागील १० जूनपर्यंत देशात २४ कोटी ६० लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या दिवसभरात देशात ३२ लाख ७४ हजार लसी देण्यात आल्या. लसीकरणाला वेग देण्यासोतच देशातील आरोग्य यंत्रणांकडून कोरोना चाचण्यांनाही प्राधान्य देण्यात येत आहे.