दक्षिण मुंबईतील फॉरेन पोस्ट कार्यालयात कॅनडातून आलेल्या पार्सलमध्ये तब्बल २ कोटी रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ सापडला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने हा गांजा ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा मुंबईत कोणी मागवला होता याचा शोध घेण्यात येत आहे.
बलॉर्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट कार्यालयात काही दिवसापूर्वी कॅनडा येथून आलेल्या एका पार्सलमधून वेगळाच वास येत असल्यामुळे या पार्सलमध्ये नक्की अमली पदार्थ असतील, या संशयावरून येथील अधिकाऱ्यांनी जवळच असणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यलायाला कळवले.
हे ही वाचा:
आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी लस घेतली का?
…आणि त्यांच्या शरीराला चिकटले चमचे, नाणी
तुमच्या खांद्यावर निष्पाप प्रेतांचे ओझे वाढतेय… जरा चाड बाळगा
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी फॉरेन पोस्ट कार्यालयातील हे पार्सल उघडून पाहिले असता त्यात या अधिकार्यांना सेंद्रीय गांजाचा साठा सापडला. दोन किलो वजनाचा हा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. हा गांजा पाच ते आठ हजार रुपयांमध्ये एक ग्रॅममध्ये विकला जातो.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनसीबीने गुन्हा नोंदविला असून त्याचा आता संबंधित अधिकारी शोध घेत आहेत. ते पार्सल कॅनडा येथून मुंबईत पाठविण्यात आले होते, मात्र ते पार्सल घेण्यासाठी कोणीही आले नाही. त्यातच या बॉक्समधून वास येत असल्याचे निदर्शनास येताच हा प्रकार उघडकीस आला.