24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनियाइंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला हरविण्याचा पाकचा 'डाव'

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला हरविण्याचा पाकचा ‘डाव’

Google News Follow

Related

पाकिस्तानची इंग्लंड विरुद्धची क्रिकेट मालिका जुलैमध्ये येऊन ठेपलेली असतानाच ही मालिका पाकिस्तानमध्ये दाखवली जाणार नसल्याचा निर्णय पाकिस्तान सरकारतर्फे घेण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी याविषयीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या मालिकेच्या आडून भारतविरोधी कुरापती करायचा पाकचा मानस दिसून येतो.

येत्या जुलै महिन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची तर तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. पण या मालिकेच्या प्रसारणाचे सर्व अधिकार भारतातल्या सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया या कंपनीकडे असल्याने ही मालिका पाकिस्तान मध्ये न दाखवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकार मार्फत घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?

आता किमान पावसाची जबाबदारी मोदींवर ढकलू नका

सेलिब्रिटीजच्या मुंबई प्रेमावर नितेश राणे बरसले

मोदी सरकारचे बळीराजाला गिफ्ट…एमएसपीमध्ये वाढ

या निर्णयामागचा पाकिस्तानचा मूळ हेतू हा भारतविरोधी डाव आहे. भारत सरकार जोपर्यंत ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरबाबत घेण्यात आलेला निर्णय मागे घेत नाही तोवर भारतीय कंपन्यांसोबत पाकिस्तान सरकार कोणताही व्यवहार करणार नसल्याचे पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितल्याचे जिओ न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पण पाकिस्तान सरकारचा हा निर्णय त्यांच्या देशातील क्रिकेट रसिकांना अजिबात पसंतीस पडलेला नसून त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात टीकेचा भडिमार सुरू केला आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी मोदी सरकारमार्फत काश्मीर विषयी एक ऐतिहासिक निर्णय देताना जम्मू काश्मीर राज्यातील कलम ३७० आणि ३५अ मिळणारे विशेषाधिकार काढून घेण्यात आले. भारत सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली असून या गोष्टीला २२ महिने उलटून गेले तरीही पाकिस्तान ही गोष्ट पचवू शकलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा