भारतीय शेती मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर आधारित असल्याने भारतासाठी मान्सून हा अतिशय आवश्यक असतो. वेधशाळेने पावसाचा काय अंदाज व्यक्त केला आहे, याकडे सर्वांच्याच नजरा खिळलेल्या असतात. परंतु भारतीय मान्सुन नक्की कसा निर्माण होतो? नुसताच सरासरी एवढा पडणारा मान्सून पुरेसा आहे का? त्यापेक्षा अधिक चांगला अंदाज आवश्यक आहे का? अशा काही प्रश्नांबाबत या व्हिडिओत चर्चा केली आहे.